वरणगावात धाडसी घरफोडी : दोन लाख 35 हजारांची रक्कम लांबवली

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे कुटूंब गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाख 35 हजारांच्या ऐवलावर डल्ला मारला. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरणगाव फॅक्टरी रोडवरील भोईवाडा भागातील रहिवासी शेख समीर शेख सलीम यांच्या घरात सदस्य झोपले असताना दोन लाख 35 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबवण्यात आली. चोरी प्रकरणी जळगाव येथील चाम नामक श्वानानला पाचार करण्यात आले तसेच तज्ज्ञांनी ठसे नोंदवले. या पथकात विनोद चव्हाण, शेषराव राठोड, वाघ यांचा समावेश होता. तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील वाणी, मझर पठाण करीत आहेत.
