रावेरात बसमधून 29 लाखांची रोकड जप्त

प्रवाशाची आयकर विभागाकडून कसून चौकशी : भुसावळच्या व्यापार्याला रोकड देण्यासाठी जात असल्याचा दावा
रावेर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर व फिरत्या पथकांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू असतानाच बुधवारी चोरवड चेक पोस्टवर एका बसमधील प्रवाशाकडून तब्बल 29 लाख 15 हजारांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली. मोहम्मद शाहजाद (25, रा.अस्थी मार्ग, खंडवा) असे या प्रवाशाचे नाव असून निवडणूक विभागाकडून या प्रवाशाची कसून चौकशी सुरू आहे. ही रोकड भुसावळ येथील व्यापार्याला देण्यासाठी जात असल्याची माहिती शाहजाद यांनी आयकर विभागाच्या अधिकार्यांना दिली. चोरवड चेक पोस्टवर स्थिर पथक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बॉर्डर चेक पोस्ट पथकांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना बुधवारी दुपारी एक वाजता बर्हाणपूरकडून भुसावळकडे जाणार्या बस (क्र.एम.पी.09 एफ.ए.3275) या मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बसमधील एका प्रवाशाकडे रोकड आढळताच खळबळ उडाली.
