रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल चौधरींच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद


उद्या रावेर ग्रामीणमध्ये मतदारांशी प्रचार रॅलीद्वारे साधणार संवाद

रावेर : रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी प्रचारात सुरुवातीपासून आघाडी घेतली असून शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्या-पाड्यातील मतदारांसह आदिवासी पाड्यांवर त्यांनी संपर्क साधून समस्या जाणून घेतल्या आहेत. गुरुवार, 10 रोजीदेखील ते ग्रामीण भागात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधणार आहेत.

या गावांमध्ये आज प्रचार रॅली
सकाळी आठ वाजेपासून पुनखेडा, पातोंडी, निंभोरासीम, दुसखेडा, थेरोळा, बोहर्डे भागात दुपारी दोन वाजेपर्यंत प्रचार रॅली निघणार असून दुपारी दोन नंतर खिरवड, नेहता, दोधे, लहान मोरगाव, मोठे मोरगाव, तामसवाडी भागात प्रचाराचा झंझावात असणार असल्याचे सांगण्यात आले.

मतदारांकडून परीवर्तनाची ग्वाही -अनिल चौधरी
भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष व रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी आतापर्यंत शहर व ग्रामीण भागात जोरदार प्रचार रॅली काढल्या आहेत. मतदारांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या आहेत. बळीराजाला योग्य सन्मान, नागरीकांना योग्य न्याय, तरुणांना योग्य संधी व मतदारसंघाच्या परीपूर्ण विकासाची ग्वाही दिली आहे. जनता जनार्दनाचा आशीर्वाद आपल्या पाठिशी असल्याने या निवडणुकीत परीवर्तन घडणारच, असा आशावाद अनिल चौधरी यांनी व्यक्त केला आहे. टिव्ही या चिन्हावर शिक्कामोर्तब करून सेवेची संधी द्यावी, असे आवाहनही ते मतदारांशी बोलताना करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !