भुसावळात आमदार संजय सावकारेंच्या प्रचार रॅलींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


शहर ग्रामीण भागातील मतदारांनी औक्षण करून दिले आशीर्वाद

भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी गुरुवार, 10 रोजी तालुक्यातील साकेगाव, जोगलखेडा, भानखेडा, खडका, किन्ही वेल्हाळा भागात जोरदार प्रचार रॅली काढली. यावेळी ठिकठिकाणी आमदारांचे सौभाग्यवतींनी औक्षण करून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. दुपारनंतर आमदारांनी शहरातील विविध भागात प्रचार रॅली काढली. यावेळी सलग तिसर्‍यांदा सावकारे हॅट्रीक साधतील, असा विश्‍वासही यावेळी मतदारांकडून त्यांना दिला जात आहे.

भुसावळातील मतदारांनी दिले आशीर्वाद
जुना सातार्‍यातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे पूजन केल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. नगरसेवक मुकेश पाटील यांच्या घराजवळ रॅलीचे स्वागत झाल्यानंतर कोळीवाडा, गणेश कॉलनी, भिरूड कॉलनी, मोहित नगर, स्वामी विहार, नारायण नगर, अयोध्या नगर, हुडको कॉलनी परीसरात रॅलीचा समारोप झाला.

यांचा रॅलीत सहभाग
रॅलीत नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू ठाकूर, अ‍ॅड.बोधराज चौधरी, मनोज बियाणी, वसंत पाटील, प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, देवा वाणी, अ‍ॅड.श्याम गोंदेकर, शिवसेनेचे देवेंद्र पाटील, देवेंद्र पाटील, हेमंत खंबाईत, वासु बोंडे, दीपक धांडे, मीना लोणारी, शैलजा पाटील, राजेंद्र नाटकर, राजीव पारीख, गोकुळ बाविस्कर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

दिराच्या विजयासाठी वहिनींनी खोचला पदर
सलग दोन टर्मपासून आमदार असलेल्या संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी मोठे बंधू प्रमोद सावकारे यांनी रात्रीचा दिवस केला आहे तर दुसरीकडे त्यांच्या मोठ्या वहिनी तथा जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारेंनी देखील प्रचारात आघाडी घेतली असून दिराला मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील प्रचार रॅलीत पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, जि.प.चे माजी सभापती राजेंद्र साहेबराव चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, गोलू पाटील, भालचंद्र पाटील, साकेगाव सरपंच अनिल पाटील, चुडामण भोळे, आनंद ठाकरे, प्रशांत पाटील, दिलीप कोळी, वसंतराव झारखंडे, महाजन आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !