भुसावळातील अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ


उद्यापासून प्रचाराचा झंझावात : माजी आमदार संतोषभाऊंच्या नेतृत्वात साकेगावातून निघणार विराट रॅली

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ नुकताच जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिरासमोर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत झाला.

यांची होती उपस्थिती
प्रचार कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी अपक्ष उमेदवार डॉ.मधू राजेश मानवतकर, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, डॉ.राजेश मानवतकर, जनआधारचे गटनेता डॉ.उल्हास पगारे, नितीन धांडे, डॉ.सुरेंद्र भिरूड, दिलीप सुरवाडे, मयुरी पाटील, आशिक खान, संतोष माळी, अ‍ॅड.एस.आर.पाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्या साकेगावातून प्रचाराचा शुभारंभ
अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर या शुक्रवारी सकाळी साकेगाव येथून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह शेतकी संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !