दोन बालिकांचा तलावात बुडून मृत्यू : अक्कलकुवा तालुक्यातील घटना

काठीचा राऊतपाडा येथील घटना : बालिकांच्या मृत्यूने हळहळ


अक्कलकुवा : गुरांना पाणी पाजताना तोल गेल्याने तलावात बुडून दोन बालिकांचा मृत्यू (Death) झाला. काठीचा राऊतपाडा, ता.अक्कलकुवा येथे ही घटना बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

मोलगी पोलीस ठाण्यात नोंद
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास काठीचा राऊतपाडा, ता.अक्कलकुवा येथील तलावात दोन बालिका गुरांना चारण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. भुमिका गुलाबसिंग वळवी (वय ९) व अंकिता दामज्या राऊत (७, दोन्ही रा.काठीचा राऊतपाडा) अशी मयत बालिकांची नावे आहेत. याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !