रावेरातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरींचे मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत

रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी शहर व तालुक्यात प्रचारास वेग घेतला असून मतदारांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. शुक्रवारी रावेर तालुक्यातील पुनखेडा, पातोंडी, थेरोळा, नेहता, दोधे, निंभोरासीम, दुसखेडा, थेरोळा, बोहर्डे, खिरवड येथे प्रचार रॅली काढण्यात आली.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
पाटोंद्याचे प्रगतशील शेतकरी श्रीराम पाटील, माजी सरपंच किशोर पाटील, गणेश बोरसे, सीताराम पाटील, उपसरपंच विक्की साबळे, शुभम पाटील, राहुल चौधरी, पिंटू वाघ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, प्रचार रॅलीप्रसंगी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी उमेदवारांशी संवाद साधला. रावेर-यावलच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध राहू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
