रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचार रॅलींना मतदारांकडून प्रतिसाद

रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी मतदारसंघात प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद लाभत आहे. शनिवारी रावेर तालुक्यातील केर्हाळा बु.॥ केर्हाळा खु.॥, बोरखेडा, भोकरी, पिंप्री आदी परीसरातील गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या प्रचार रॅलीला मतदारांकडून जोरदार प्रतिसाद लाभला शिवाय ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
