भुसावळातील हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांचे निधन
शहरातील हिंदू हाऊसिंग सोसायटीतून निघणार उद्या अंत्ययात्रा
भुसावळ : बी.एन.ए.इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक व हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष, उद्योगपती व शहरातील हिंदू हाउसिंग सोसायटी, तापी नगर भागातील रहिवासी जगदीश अग्रवाल (82, जे.टी.अग्रवाल) यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, सुना, जावाई, नातवंडे असा परीवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, 9 रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे. ते सुरेश अग्रवाल यांचे भाऊ तर मिलिंद अग्रवाल यांचे वडील होत.


