भुसावळातील अल्पवयीन बालिकेचा विनयभंग : आरोपीला कोठडी

भुसावळ : जामनेर रस्त्यावरील अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीताला जमावाने पब्लिक मार देत बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले होते तर पोलिसांनी आरोपी अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. रविवारी या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पोलिस कोठडीचा हक्क कायम राखून ठेवत संशयीताची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीचा हक्का राखत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीची तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या समक्ष ओळख परेड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
