बोदवडमध्ये नम्र फायनान्सचे कार्यालय फोडले : 12 लाखांची रोकड लंपास


बोदवड : शहरातील जामठी रस्त्यावर असलेल्या ठोंबरे दुग्धालयाच्या वर असलेल्या नम्र फायनान्स कार्यालयातून चोरट्यांनी चक्क 12 लाखांची रोकड लांबवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चोरीच्या अनुषंगाने पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटवली जात आहे. बोदवड शहरातील जामठी रस्त्यावर बचत गटांना अर्थसहाय्य करणारी ही संस्था आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार नागरीकांच्या लक्षात आला.

सीसीटीव्हीत संशयीताची छबी कैद
सूत्रांच्या माहितीनुसार, नम्र फायनान्स या कार्यालयाच्या बाजूच्या एका खोलीत अमोल मोरे हा कर्मचारी झोपला होता मात्र कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी चोरी केली असलीतरी आपल्याला कुठलाही आवाज आला नाही, असे त्याने सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळवलेल्या फुटेजमध्ये एक संशयीत तोंडाला रूमाल बांधून हातात लोखंडी रॉड घेवून फिरताना स्पष्ट दिसत आहे.

मोबाईलसह 12 लाख लांबवले
बचत गटांना अर्थसहाय्य करण्यासह वसुली आलेली एकूण 11 लाख 95 हजार 752 रुपयांची रोकड व विवो कंपनीचा 12 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवल्याचे सूत्रांनी सांगितले. चोरीची माहिती कळताच बोदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !