यावल तालुक्यात उद्या अपक्ष उमेदवार अनिलभाऊ चौधरी यांच्या ठिकठिकाणी प्रचार रॅली

रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी हे मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी यावल तालुक्यात आपल्या शेकडो समर्थकांसह प्रचार रॅली काढणार आहेत. दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान त्यांच्या प्रचार रॅली काढण्यात येणार आहेत. त्यात सातवद, कोळवद, वड्री, परसाळे, चितोडा, डोंगरकठोरा, सांगवी बु.॥, बोरखेडा-सांगवी, हिंगोणा, हंबर्डी आदी गावात प्रचार रॅली काढण्यात येणार असून कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने या रॅलींमध्ये सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
