मासे चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून

धडगाव तालुक्यातील सेलदा पाटीलपाड्याची घटना


नंदुरबार  : मासे चोरीच्या संशयावरून दोघांनी 29 वर्षीय तरुणाचा खून (Murder) केला. या प्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली. धडगाव तालुक्यातील सेलदा पाटीलपाडा येथे ही घटना घडली.

मारहाणीत तरुणाचा झाला मृत्यू
धडगाव तालुक्यातील सेलदा पाटीलपाडा येथील नर्मदा बॅक वॉटरच्या पूर्वेकडील किनार्‍यावर रुमाल्या मांगल्या पावरा याने जितेंद्र सुभाष पावरा याच्या मामाच्या जागेत वीटभट्टी लावली. त्याचबरोबर जितेंद्र पावरा व बोख्या धुडक्या पावरा हे दोघे दुसर्‍याचे जाळे टाकून मासे पकडत होते. त्यातून काही मासे घेतात असे रुमाल्या पावरा हा जाळे मालकाला सांगत असल्याच्या संशयावरून जितेंद्र पावरा व बोख्या धुडक्या पावरा या दोघांनी रुमाल्या मांगल्या पावराला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वसीबाई रुमाल्या पावरा (रा.सेलदा पाटीलपाडा, ता.धडगाव) यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात (Police Station) जितेंद्र पावरा, बोख्या धुडक्या पावरा (दोन्ही रा.सेलदा पाटीलपाडा, ता.धडगाव) यांच्या विरोधात गुन्हा (Murder)  दाखल झाला आहे. पोलिसांनी जितेंद्र सुभाष पावरा यास अटक करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !