दीपनगरातील कंत्राटदारावर गोळीबार करणार्‍या आरोपीला कोठडी


भुसावळ : दोन कंत्राटदारांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर एका कंत्राटदाराने दुसर्‍या कंत्राटदारावर थेट गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची घटना गुरुवार, 10 रोजी सकाळी 10.15 वाजता दीपनगरातील वसाहतीमध्ये घडली होती मात्र सुदैवाने झालेल्या झटापटीत कट्टा खाली पडल्याने कंत्राटदाराचे प्राण वाचले होते. या प्रकरणी अ‍ॅश वाहतूक कंत्राटदार दीपक मधुकर हतोले (38) यास तालुका पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी कोठडी संपल्याने आरोपी हतोले यास भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दसर्‍याच्या शुभेच्छा देत झाडली होती गोळी
दीपनगरातील राखेची वाहतूक करणारे बडे कंत्राटदार मुकेश शैलेंद्र तिवारी (45, मूळ रा.कल्याण) हे दीपनगर वसाहतीतील एम- 29/2 या इमारतीत राहतात. गुरुवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास ते तयारी करीत असतानाच संशयीत आरोपी तथा कंत्राटदार दीपक मधुकर हातोले (48) यांनी नमस्कार करीत त्यांना हॅपी दसराही म्हटले तसेच घराबाहेर फटाक्यांची मोठी लड लावली व तिवारी यांच्यावर कट्टा रोखला होता तर याचवेळी तिवारी यांनी समयसूचकता दाखवत गावठी कट्टा हिसकावण्याचा प्रयत्न करताना कट्टा व त्यातील मॅग्झीन खाली पडल्याने तिवारी यांचे प्राण वाचले होते तर आरोपी हतोले यास अटक करण्यात आली होती. आरोपीची सोमवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यास भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !