आमदार संजय सावकारे यांचा दीपनगरासह रेल्वे कर्मचार्यांशी संवाद

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना रीपाई रासप व शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय वामन सावकारे यांनी मंगळवारी सकाळी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगरातील कर्मचार्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी निंभोरा येथील सरपंच योगीराज सोनवणे, माजी सरपंच गुरूजीतसिंग (गोटुशेठ) चाहेल, राजु साबळे, ग्रामपंचायत सदस्य उल्हास बोरोले, सन्नी चाहेल, दीपक बर्हाटे, प्रशांत पाटील, दत्तु साबळे, गणपत फेगडे, राजधर तायडे, उज्वला सपकाळे, प्रतिभा राजधर तायडे आदी उपस्थित होते.
रेल्वे कर्मचार्यांचीदेखील घेतली भेट
आमदार सावकारे यांनी सोमवारी रेल्वे कर्मचार्यांनी पहाटे सहा वाजता डीआरएम कार्यालयाजवळ जाऊन भेट घेतली. यावेळीही कर्मचार्यांनी आमदार सावकारे यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी नगरसेवक मनोज बियाणी, नगरसेवक किरण कोणते यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
