मतदारांच्या वैयक्तिक भेटी-गाठींवर अपक्ष उमेदवार सतीश घुलेंचा भर

तपतकठोर्यात मतदारांशी साधला संवाद : परीवर्तनासाठी मागितला कौल
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी रविवारी मंगळवारी दुपारी भुसावळ तालुक्यातील तपतकठोरासह नजीकच्या अन्य गावांना भेट देवून मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. याप्रसंगी त्यांनी मतदारांशी संवादही साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक समर्थकांनी त्यांच्यासोबत ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला.
परीवर्तनासाठी कौल द्या -सतीश घुले
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या गाठी-भेटी घेत आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी मतदारांशी संवाद साधतांना सांगितले.
