दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन् वंचितांचे तोंड गोड करू या

अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ आणि शैक्षणिक दीपस्तंभचा अनोखा उपक्रम
भुसावळ : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. घरोघरी फराळ, गोड पदार्थ या निमित्तानं बनवले जातात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य, आप्तेष्ट त्याचा सुखेनैव आनंद लुटतात मात्र दर्या-खोर्यात, वाड्या-वस्त्यांतील आदिवासी बांधवांची दिवाळी अंधारातच असते. एका वेळच्या भाकरीच्या चंद्रासाठी त्यांना पोटाला चिमटा देऊन मैलोन मैल अंतर पायी गाठावे लागते. जेथे पीठात पाणी टाकून तेच दूध म्हणून चिमुकल्यांना पाजले जाते, तेथे मिष्ठान्न अन् फराळाची चव घेणे दुरापास्तच समजायला हवे. ‘सार काही समष्टीसाठी’ हे बिरूद डोळ्यासमोर ठेऊन भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने 2016-17-18 मध्ये आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे व सहकार्याने यंदाही सातपुड्यातील वाड्या, पाडे, वस्त्यांतील उपेक्षित बंधू-भगिनींना दीपोत्सवात फराळ, शैक्षणिक साहित्य, कपडे वाटप करण्याचा निर्धार केला आहे आणि या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम या वर्षी अंतर्नाद प्रतिष्ठान आणि शैक्षणिक दीपस्तंभ परीवार, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे.
वंचितांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार
गतवर्षी अनेक दात्यांनी केलेल्या सहकार्यातून घरातील फराळ, नवीन कपडे, जूने कपडे, ब्लँकेट आणि आर्थिक मदतीतून नवीन कपडे आणि शैक्षणिक साहित्य यातून यावल तालुक्यातील काळाडोह व मोर धरण या आदिवासी वस्त्यांवरील बांधवांची दिवाळी खरोखर आनंदाची आणि गोड केली. या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर नवीन वस्तीचा शोध घेऊन वंचितांपर्यंत पोहचण्याचा निर्धार करण्यात आला आहे. घरात दिवाळीच्या निमित्ताने जो फराळ, गोड खाद्यपदार्थ बनवले जातील त्यातील वाटीभर वाटा वंचितांच्या ओंजळीत टाकण्यासाठी द्यावा. लहान मोठ्यांसाठी कपडे (स्वेटर, ब्लँकेट, जूने कपड़े असतील तर धुवून इस्त्री करून द्यावे), शैक्षणिक साहित्य अथवा आर्थिक मदत अंतर्नाद प्रतिष्ठानच्या आणि शैक्षणिक दीपस्तंभ परीवाराच्या स्वयंसेवकांशी यासाठी संपर्क साधावा. गोळा केलेला फराळ, कपडे, शैक्षणिक साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवून यंदाचा दीपोत्सव आणखी तेजोमय करू या! चला तर मग द्या एक वाटीभर फराळ व गोड खाद्यपदार्थ; अन् व्हा आनंद, प्रकाशाची पेरणी करणार्या वारीचे वारकरी!!
संपर्क साधण्याचे आवाहन
या उपक्रमात कोणालाही फराळ, शैक्षणिक साहित्य, नवीन/जूने कपडे काही आर्थिक रूपाने मदत करावयाची असल्यास त्यांनी प्रकल्पप्रमुख
शैलेंद्र महाजन (9423476837), तेजेंद्र महाजन (9511213830), ज्ञानेश्वर घुले (9420557753), पुष्कर चौधरी (9373411845), योगेश इंगळे (7588815381), प्रसन्ना बोरोले (9371748877), प्रा.श्याम दुसाने (9270128339), जीवन महाजन (7588815384), समाधान जाधव (9022464981), मिलिंद पाटील (9511823340), संदीप रायभोळे (9096612321), हरीष कोल्हे (7588686870), देव सरकटे (8983610917), भूषण झोपे (9969372188), अमित चौधरी (9421741824) व संदीप वसंतराव पाटिल (7588009492,9209248392) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.
