मातोश्रीच्या आदेशानंतर कामाला लागणाराच खरा शिवसैनिक


आमदार संजय सावकारे : प्रचार कार्यालयात शिवसैनिकांची बैठक

भुसावळ : मातोश्रीचा आदेश आल्यानंतर कामाला लागतो तोच खरा शिवसैनिक असून शिवसेनेचाच नव्हे तर सर्वच पक्षांनी पक्षाचा आदेश आल्यानंतर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची गरज असल्याचे मत, भाजपा- शिवसेना, आरपीआय, रासप, महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. प्रचार कार्यालयात मंगळवारी सायंकाळी शिवसैनिकांच्या आयोजित बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप भोळे होते.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीळकंठ फालक, जिल्हा उपप्रमुख अ‍ॅड.शाम श्रीगोंदेकर, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नमा शर्मा, अ‍ॅड.निर्मल दायमा, प्रा.धीरज पाटील, शरद जयस्वाल, माजी नगरसेवक तथा तालुका उपप्रमुख पप्पू बारसे, गोकुळ बाविस्कर, हेमंत खंबायत, निलेश मराठे, प्रा.विनोद गायकवाड, धनराज ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भोळे, सुरेश पाटील, राकेश खरारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर वाणी, गोलू कापडे आदी उपस्थित होते.

लोकशाहीमध्ये उमेदवारी मागणे चुकीचे नाही
आमदार संजय सावकारे मार्गदर्शन करताना म्हणाले की, लोकशाहीमध्ये उमेदवारी मागणे चुकीचे नाही, उमेदवार घोषित झाल्यानंतर महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा एकदिलाने काम करावे, असेही ते म्हणाले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत आपल्याला आदर असल्याचे ते म्हणाले.

बाळासाहेबांचा शिवसैनिक केवळ प्रेमाचा भुकेला -गुंजाळ
शिवसैनिक हा केवळ प्रेमाचा भुकेला आहे त्यामुळे निवडणुकीनंतरही शिवसैनिकांना मानाचे स्थान मिळावे, अशी अपेक्षा नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा उपप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर, माजी तालुकाप्रमुख नीळकंठ फालक, प्रा.धीरज पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक देवेंद्र पाटील यांनी केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !