आमदार हरीभाऊ शेतकर्‍यांच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता


मध्यप्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस : प्रचारार्थ घेतल्या दोन सभा

रावेर : रावेर विधानसभा क्षेत्रात शेतकर्‍यांच्या हितासाठी लढणारा लढवय्या म्हणून आमदार हरीभाऊ यांचे नांव आहे. मेगा रीचार्ज योजनेला गती त्यांच्या परीश्रमाचे मेहनतीचे फळ असल्याचे गौरवोद्गार मध्यप्रदेशच्या माजी शिक्षण मंत्री अर्चना चिटणीस यांनी रावेर तालुक्यातील वाघोड व खानापूर या ठिकाणी आमदार जावळे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत काढले. सोमवारी दिवसभरात माजी मंत्री अर्चना चिटणीस यांनी रावेर तालुक्यात आमदार हरीभाऊ जावळे यांच्यासाठी आयोजित प्रचार रॅलीत सहभाग घेतला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महायुतीचे उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे, सुरेश धनके, पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, विरेन तिवारी, कृऊबा संचालक गोपाळ नेमाडे, शहापूर येथील नगरसेवक विनोद चौधरी, किशोर पाटिल, रामदास पाटील, प्रकाश लष्करे, योगेश चौधरी, भूषण पाठक, सुनील बंड, पी.के.महाजन, अमोल पाटील, संदीप सावळे व मान्यवर उपस्थित होते.

आमदार जावळेंनी केली विकासकामे
चिटणीस पुढे बोलतांना म्हणाल्या की, आमदार हरीभाऊ जावळे यांनी खानापूरकरीता 62 लक्ष रुपयांची पेयजल योजना, त्यात 50 हजार लीटर क्षमतेचे जलकुंभ, 20 लक्ष निधीतून काँक्रीटीकरण, 10 लक्ष निधीतून गटारीला मंजुरी आदी कामे केली आहेत.

यांचाही प्रचारात सहभाग
प्रसंगी उमेश महाजन, प्रल्हाद पाटील, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, संतोष महाराज, विजय महाजन, संजय महाजन, शिवसेना विभाग प्रमुख शामराव महाजन, भास्कर पाटील, शाखाध्यक्ष डॉ.तुषार धांडे, प्रदीप धांडे, नथ्थु धांडे, तालुका सरचिटणीस युवा मोर्चा कन्हैया भारते, युवामोर्चा शाखा अध्यक्ष निखील भारते व ग्रामस्थ उपस्थित होते. खानापुर व वाघोड येथे हरीभाऊ जावळे यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन वासु नरवाडे तर आभार प्रसाद धर्माधिकारी यांनी मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !