मोठी बातमी : तेलंगणात पोलिस व सीआरपीएफच्या कारवाईत 11 नक्षलींचा खात्मा


हैदराबाद : तेलंगणा आणि छत्तीसगढच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या चकमकीत 11 नक्षलींना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले असून आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. किस्तराममधील जंगल भागात नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. तेलंगणा पोलिस, छत्तीसगढ पोलिस आणि सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली, अशी माहिती तेलंगणातील भद्राद्री कोथागुडेम जिल्ह्याचे पोलि अधीक्षक सुनील दत्त यांनी दिली. तेलंगणा ग्रे हाउंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली.

पोलिसांचे पथक लक्ष ठेवून
सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत ही नक्षलविरोधी मोहीम सुरुच होती. पोलिसांचे पथक इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ही कारवाई तेलंगणा ग्रे हाउंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले. छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांनी दोन इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) जप्त केल्यानंतर काही तासांतच ही चकमक झाली.





तेलंगणात नक्षलविरोधी मोहिम तीव्र
जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाया करणार्‍या सुरक्षा कर्मचार्‍यांना लक्ष्य करण्यासाठी आयईडी पेरण्यात आले होते. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्ह्यात सुरक्षा कर्मचार्यांना लक्ष्य करुन नक्षलवादी आयईडी पेरत आहेत, कारण त्यांना अबुजमाद आणि बस्तर भागातील स्थानिकांचा पाठिंबा कमी होत आहे. गेल्या काही महिन्यांत, जिल्ह्यातील बंडखोरग्रस्त भागात कसून शोध घेण्यात येत आहे, असे एका अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !