पाचोरा पालिकेतील नगरसेवकांचा सन्मानपत्राने गौरव

पाचोरा : पाचोरा येथील नगरपरीषदेतील नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा कार्यकाळ 29 डिसेंबर रोजी संपल्याने पालिका इतिहास प्रथमच नगरसेवकांना सन्मानपत्र देऊन बुधवारी गौरवण्यात आले. बुधवारी पालिकेची सभा झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर नगरपालिकेच्या सभागृहात कोवीड 19 नियमांचे पालन करुन छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष संजय गोषसल, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक विकास पाटील आदींची आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करतांना अध्यक्ष गोहिल यांनी गेल्या 5 वर्षात नगरपरिषद प्रशासन व सहकार्य नगरसेवकांनी जे सहकार्य केले तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या बद्दल मी ऋणी असल्याचे सांगीतले. मुख्याधिकारी यांनी संपुर्ण सभागृहाचे गेल्या 5 वर्षात प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
माजी उपनगराध्यक्ष यांनी सभागृहाचे आभार मानत अशा प्रकारे पहिल्यांदाच सत्कार होत असल्याने प्रशासनाचे देखील आभार मानले.
यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील, सदस्य अशोक शंकर मोरे, सतीष पुंडलिक चेडे, हर्षाली दत्तात्रय जडे, वासुदेव भिवसन माळी, संगीता आनंदा पगारे, मनीष भोसले, महेश प्रकाशराव सोमवंशी, रंजना प्रकाश भोसले, मालती बापु हटकर, राम ग्यानचंद केसवाणी, निलीमा शरद पाटील, शेख बशीर शेख, मोहम्मद बागवान, उपमुख्याधिकारी दगडू शिवाजी मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाशभोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, अभियंता ईश्वर सोनवणे, हिमांशू जैस्वाल, लेखापाल दत्तात्रय जाधव, सभा लिपिक राजेंद्र शिंपी, लिपिक ललित सोनार, किशोर मराठे, राकेश मिश्रा, संदीप जगताप, आकाश खैरनार, महेंद्र गायकवाड आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
