भुसावळ ग्रामीणमध्ये फटाक्यांची आतषबाजी करीत आमदारांचे स्वागत


प्रचार रॅलीला मतदारांकडून प्रतिसाद : आमदारांचे जागोजागी औक्षण

भुसावळ : भाजपा-शिवसेना, आरपीआय, रासप महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी बुधवारी तालुक्यातील गोजोरे, वराडसीम, बेलव्हाय, सुनसगाव, वांजोळे आदी भागात पत्नी रजनी सावकारेंसह प्रचार रॅली काढण्यात आली. प्रसंगी वराडसीमसह सर्वच गावांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत प्रचार रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. गोजोर्‍यात बुधवारी सकाळी आठ वाजता प्रचार रॅलीचे आगमन झाल्यानंतर आमदारांनी विठ्ठल मंदिरासह विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत व प्रचारास प्रारंभ केला.

यांचा प्रचार दौर्‍यात सहभाग
प्रचार दौर्‍यात पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य मनीषा भालचंद पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोलू पाटील, माजी सभापती सुनील महाजन, राजेंद्र पुंडलिक चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोपान भारंबे, कुर्‍हे पानाचे येथील माजी सरपंच सुभाष पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य समाधान पवार, सरपंच रामलाल बडगुजर, खडका येथील भैय्या महाजन, संजय पाटील, किन्ही येथील ए.टी.पाटील, एल.एस.पाटील, माधव पाटील, गोजोरे येथे माजी सरपंच शिवाजी पाटील, भूषण कोळी, कौतीक ठोंबरे, पद्माकर पाटील, दिलीप कोळी, किशोर राणे, रामा कोळी, वराडसीम येथे माजी सरपंच अविनाश वायकुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिगंबर वाणी, माजी सरपंच निवृत्ती मावळे, एकनाथ पाटील, दीपक ढाके, आत्माराम कोळी, देवदास पढार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ठाकूर, मनोज कोल्हे, दीपक ढाके, सुभाष कोळी, निलेश वायकोळे तसेच बेलव्हाय येथे नवीन पेटकर, दिगंबर भंगाळे, कृष्ण तुषार, राकेश खाचणे, सागर पवार, तेजस सोनवणे, सिद्धार्थ पवार आदी कार्यकर्त्यांसह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !