भुसावळातील अपक्ष उमेदवार हे चौधरींनीच उभे केलेले


आमदार संजय सावकारे यांचा भुसावळच्या सभेत दावा : माजी आमदार संतोष चौधरींवर टिका

भुसावळ : भुसावळातील अपक्ष उमेदवार हे माजी आमदार संतोष चौधरी यांनीच उभे केले असून जे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत ते इतरांना काय निवडून आणणार? असा प्रश्‍न उपस्थित करीत भुसावळातील खड्डे हे चौधरींचीच देण असल्याची टिका आमदार संजय सावकारे यांनी येथे केली. शहरातील जामनेर रोडवरील नेहरू मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी सभा झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

तिकीट रद्द होण्याच्या उडवल्या अफवा
आमदार सावकारे म्हणाले की, सुरुवातीला यांनी माझे तिकीट कट होणार असल्याच्या अफवा उडवल्या मात्र त्यात त्यांना यश आले नाही नंतर सतीश घुले हेच राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील हेदेखील जाहीरदेखील केले मात्र जगन सोनवणे यांना उमेदवारी मिळाली मात्र त्यानंतर त्यांनी डॉ.मधू मानवतकर याच आपल्या उमेदवार असल्याचे जाहीर केले. जे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत तर इतरांना काय निवडून आणणार? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित करीत चौधरींचे नाव न घेता टिका केली.

भुसावळातील गुंडगिरीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
चौधरींनी भुसावळातील खड्ड्यांबाबत बक्षीस जाहीर केले मात्र हे बक्षीस त्यांना मिळणार असून कारण त्यांच्याच काळात हे खड्डे झाल्याचे आमदार सावकारे म्हणाले. हॉस्पीटल उभारणार, एक हजार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणार असल्याची यांनी घोषणा केल्या मात्र स्वतःची शाळा यांना सांभाळता आली नाही, ती आता बंद असल्याची टिका आमदारांनी केली. भुसावळात वाढलेल्या गुंडगिरीची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून येथे आता डीसीपी दर्जाचा अधिकारी राहणार असल्याचे ते म्हणाले. भुसावळातील घरकुल घोटाळा चौधरींसाठी अडचणीचा ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

भुसावळ शहराने टाकली कात
भुसावळात 660 मेगावॅटचा प्रकल्प, खासदार रक्षाताईंच्या प्रयत्नाने आलेली कोच फॅक्टरी, हतनूर-तळवेल उपसा सिंचन योजना, बंद झालेले लोडशेडिंग, जंक्शन स्थानकाचा झालेला विकास, डीवायएसपी कार्यालय, क्रीडा संकुल, एमआयडीसीचा झालेला विकास, अतिरीक्त सत्र न्यायालयामुळे शहर आता कात टाकत असून जिल्हानिर्मितीकडे त्याची वाटचाल सुरू असल्याचे आमदार म्हणाले.

खोट्या-नाट्या पत्रकांना अर्थ नाही
भुसावळातील काहींना हाताशी धरून खोटी-नाटी पत्रके काढली जात असून त्याला अर्थ नाही, असे सांगून आमदार सावकारे म्हणाले की, माझे विरोधक जगन सोनवणे त्यांचा चांगला समाचार घेत असून भाजपाचा पहिला आमदार व मंत्री होण्याचा मला मान मिळाला व आता तिसर्‍यांदा हॅट्रीक होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह भाजपाचे नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू (निर्मल) कोठारी, पिंटू ठाकूर, अ‍ॅड.बोधराज चौधरी, मनोज बियाणी, किरण कोलते, निक्की बत्रा, अ‍ॅड.श्याम गोंदेकर, विजय चौधरी, शफी पहेलवान, अनिकेत पाटील, गिरीश महाजन, रजनी सावकारे, शैलजा पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !