750 हून अधिक पुरस्कारांनी ‘अनाथांची माय’सिंधुताईंचा गौरव
पुणे : ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री 8.10 वाजेच्या सुमारास हृदयविकारोन निधन झाले. अवघं आयुष्य अनाथांच्या सेवेमध्ये झिजवणार्या माईंच्या निधनाने देशभरातून शोककळा व्यक्त होत आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना 750 हून अधिक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.


राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला पद्मश्री पुरस्कार
माईंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे.
माईंना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार असे
पद्मश्री पुरस्कार (2021)
डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
सीएनएन-आयबीएन आणि रीलायन्स फाउंडेशनने दिलेला ’रिअल हीरो पुरस्कार’ (2012)
पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (2012)
महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (2010)
दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’ (2008)
पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
सोलापूरचा डॉ.निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
राजाई पुरस्कार
शिवलीला महिला गौरव पुरस्कार
’सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (1992)
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला ’मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स न्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.


