दौर्यात मोठी चूक : शेतकर्यांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मिनिटे अडकले
फिरोजपूर : पंजाब पोलिसांचा मोठा हलगर्जीपणा समोर आला असून पीएम मोदी (PM Narendra Modi) एका सभेला जात असताना शेतकर्यांनी त्यांचा ताफा अडवल्यानंतर पंतप्रधान तब्बल 15-20 मिनिटे अडकल्याची घटना पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील मुडकीजवळ घडली. राष्ट्रीय महामार्गावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जात असताना शेतकर्यांनी त्यांना अडवले. पंतप्रधानांना जिथे थांबावे लागले ते ठिकाण अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. या ठिकाणापासून अवघ्या 30 किमी अंतरावर पाकिस्तान आहे.
पठाणकोट स्फोटामुळे पंजाब हाय अलर्टवर
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असल्यामुळे फिरोजपूर हा पंजाबमधील अतिशय संवेदनशील जिल्हा आहे. येथे पंतप्रधानांच्या मेळाव्याची घोषणा दीड आठवड्यापूर्वी करण्यात आली होती. दुसरीकडे लुधियाना आणि पठाणकोटमध्ये नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण पंजाब हाय अलर्टवर आहे. 15 सप्टेंबर 2021 रोजी ज्या जलालाबाद शहरामध्ये स्फोट झाला होता तेही फिरोजपूरजवळ आहे आणि एनआयएच्या (NIA) तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.




याच परिसरात टिफिन बॉम्बची डिलिव्हरी
जलालाबाद बॉम्बस्फोटानंतर एनआयएने टिफिन बॉम्ब पुरवल्याप्रकरणी अटक केलेला गुरुमुखसिंग रोडे हा मोगा जिल्ह्यातील रोडे गावचा रहिवासी असून ते जर्नेलसिंग भिंडरवालाचे जन्मस्थान आहे. भिंडरवाला याचा पुतण्या आणि पाकिस्तानात आश्रय घेतलेला खलिस्तानचा दीर्घकाळ पुरस्कर्ता असलेला लखबीर सिंग रोडेही याच भागातील आहे. लखबीर सिंग रोडे याने गुरुमुखामार्फत सीमेपलीकडून टिफिन बॉम्ब (Tifin Bomb) पोहोचवले होते. फिरोजपूर सेक्टरमध्ये एक-दोन टिफिन बॉम्ब पोहोचवल्याची कबुली गुरुमुखने केंद्रीय यंत्रणांसमोर दिली होती. अशा परिस्थितीत, पंतप्रधानांच्या रॅलीच्या माहितीनंतर पंजाब पोलिसांकडे (Panjab Police) तयारीसाठी पुरेसा वेळ होता, परंतु त्यांची काउंटर इंटेलिजन्स विभाग आणि इतर गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली.
गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी
पंजाब सरकारचा (Panjab Goverment) दावा आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी (PM Narendra Modi) 10,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पंजाब पोलिसांनी बुधवारी सकाळी भटिंडा-फिरोजपूर चार लेनचीही तपासणी केली. सकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत महामार्गावर कुठेही अडथळा नव्हता. दुपारी 12 नंतर अचानक परीस्थिती बिघडू लागली आणि शेतकरी संघटनांचे सदस्य आणि उपद्रवी घटक महामार्गावर पोहोचले. यादरम्यान पंजाब पोलिसांची (Panjab Plice) गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले.
