बोदवड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखला जाईल


डॉ.संध्या सोनवणे : जलशक्ती अभियान अंतर्गत संशोधन प्रकल्प प्रारंभ

बोदवड : बोदवड शहरात नियमित पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रकल्पातंर्गत पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास बोदवड पॅटर्न संपुर्ण महाराष्ट्रभर ओळखला जाईल, असे यावल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी सांगितले. बोदवड महाविद्यालयात अ स्टडी ऑन वॉटर मॅनेजमेंट ऍंड डेफिसेसी इन बोदवड या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संशोधन प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावलीचे प्रकाशन व सर्वेक्षणामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रश्नवली वाटपाचा कार्यक्रम यावल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्याहस्ते झाला. याप्रसंगी डॉ.सोनवणे बोलत होत्या.

प्रश्नावलीचे महत्त्व सांगितले
अध्यक्षस्थानी बोदवड महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी होते. प्रमुख पाहूणे म्हणून उपप्राचार्य डी.एस.पाटील यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प लेखन व प्रश्नावली भरण्यासंदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन केले. यामध्ये पाणी व्यवस्थापन, पर्जन्यमापन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, कुटुंबातील सदस्यांचा दरडोई पाण्याचा वापर यासंदर्भात मार्गदर्शन केले. या सोबतच संशोधनामध्ये प्रश्नावलीचे असणारे महत्त्व अधोरेखित केले तसेच याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास भविष्यामध्ये या जलशक्ति अभियानामुळे पाण्याचा हा बोदवड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखला जाईल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अरविंद चौधरी यांनी देखील विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानाचे वेगवेगळे टप्पे व संशोधनाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.कांचन दमाडे तर सूत्रसंचालन डॉ.ईश्वर मसलेकर तसेच आभार प्रा.अदिती पाटील यांनी मानले.

यांचीही होती उपस्थिती
कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.मधुकर खराटे, प्रा.पी.एन.पाटील, प्रा.अजय पाटील, प्रा.डॉ.अनिल बारी, प्रा.नितेश सावदेकर, प्रा.कोटेचा, प्रा.इंगळे, प्रा.डॉ. जवरास, प्रा.डॉ.गीता पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू मोपारी, अतुल पाटील, दीपक जोशी यांनी परीश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !