अंजनसोंड्यातील दोघे गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह वरणगाव पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : तालुक्यातील अंजनसोंडे गावातील दोघांना गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक करण्यात आल्याने गावात खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गावठी कट्टा तसेच शस्त्र जप्तीचे आदेश असल्याने वरणगाव पोलिसांकडून संशयीतांचा शोध सुरू असताना गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर अंजनसोंडे गावातील दीपक गोपाळ कोळी (22) व सोनू उर्फ प्रशांत नितीन कोळी (22) यांना गुरुवारी अटक करण्यात आली. आरोपी दीपक कोळीच्या घरातून आठ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व 50 रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. हवालदार नागेंद्र तायडे यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !