रावेर-यावल मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपला मतदान करा


आमदार हरीभाऊ जावळे : प्रचारादरम्यान मतदारांशी साधला संवाद

रावेर : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाचे कणखर सरकार काम करत आहे, पुलवामा हल्ल्याचा बदला घेवून सरकारने देशाची ताकद दहशतवाद्यांना दाखवून दिली आहे. चंद्रयान-2 भारतीय संशोधनाने पाठवण्याची मोहीम, काश्मीरमध्ये 370 व 35-अ रद्द करण्याचा धाडसी निर्णय, पंतप्रधान मोदी यांच्याच नेतृत्वाने करून दाखवल्याने देशाची अस्मिता वाढली आहे, अशा विचाराच्या सरकारला मत म्हणजे स्वाभिमानाला मत, विकासाला मत असे विचार आमदार हरीभाऊ जावळे यांनी गुरुवारी मतदारांशी बोलताना व्यक्त केले. गुरुवारी, भाजपा-शिवसेना, रीपाइं, रासप महायुतीचे उमेदवार तथा आमदार हरीभाऊ जावळे यांची महारॅली सिंदखेडा, मुंजलवाडी, गौरखेडा, लोहारा, पाल, वडगांव या गावांमध्ये काढण्यात आली. प्रसंगी आमदार जावळेंनी मतदारांशी संवाद साधला. गरीबांसाठी उज्ज्वला योजना, उपचाराकरीता आयुष्यमान योजना, स्वच्छतेसाठी व्यक्तिगत शौचालय उभारणीसाठी अनुदान, मेक इन इंडिया अशा अनेक महत्वाकांक्षी योजनांमुळे सर्वसामान्य जनतेसाठी विकासाची दारे उघडली गेली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, कृउबा संचालक गोपाळ नेमाडे, अमोल पाटील, तालुका सरचिटणीस वासू नरवाडे, अ‍ॅड.प्रवीण पासपोहे, प्रदीप पाटील, माजी समाजकल्याण सभापती अहमद तडवी, मुलचंद पवार, नसीर तडवी, धनलाल पवार, काळू पवार, अख्तर तडवी, वडगांव येथे राजेंद्र वाघोदे, मनोहर पाटील, योगेश वाघोदे, सत्यवान भालेराव, विजय पाटील, आरीफ तडवी, छबू तडवी, सलीम तडवी, भागवत भालेराव, मुबारक तडवी, सलीम तडवी, रवींद्र भालेराव, रवींद्र भालेराव, सुनील भालेराव, साहेबराव पाटील, पुंडलिक पाटील व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रचार रॅॅलीमध्ये आमदार जावळे यांचे ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !