बुधवारपेठेत दगडूशेठ हलवाई गणपतीही ; विकृतांनी आपापल्या परीने लावला अर्थ : माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले
खडसे उवाच : विकृतांनी त्या वाक्याचा अर्थ आपल्या सोयीने लावला : ‘मनी वसी ते स्वप्नी दिसे’
भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजनांना (Mla Girish Mahajan) बुधवारपेठेत पाठवण्याचे गरज असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी वादंग निर्माण झाले होते. खडसे यांनी या वाक्याचा पुन्हा पुर्नउच्चार केला असून महाजनांना बुधवारपेठेत पाठवण्याचा उद्देश आपला प्रांजळ असल्याचे सांगत त्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने सद्बुद्धी मिळावी, असाच होता मात्र विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी या वाक्याच्या अर्थ त्यांच्या परीने लावला, असेही माजी मंत्री खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी स्पष्ट केले आहे.
बुधवारपेठेत श्रद्धास्थान दगडूशेठ हलवाई गणपती
माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी आपल्या वाक्याबाबत पुन्हा एकदा स्पष्ट केले की, महाजनांनी (Mla Girish Mahajan) आपल्याला ठाण्याला पाठवण्याचे वक्तव्य केल्यानंतर आपण त्यावर प्रतिक्रिया देताना महाजनांना बुधवारपेठेत पाठवावे लागेल, असे सांगितले होते मात्र बुधवारपेठेत सर्वांचे श्रद्धास्थान दगडूशेठ हलवाई गणपती असून त्यांच्या दर्शनाने किमान गिरीश महाजनांना सुबुद्धी मिळेल, अशी आपली भावना होती मात्र विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी आपापल्या परीने या वाक्याचा अर्थ काढला अर्थात जे ‘मनी दिसे ते स्वप्नी दिसे’ असेही खडसे म्हणाले.




आपला हेतू प्रांजळ मात्र विकृतांनी सोयीने अर्थ लावला
खडसे (Eknathrav Khadse) यांनी स्पष्ट केले की, बुधवारपेठेत दगडशेठ हलवाई गणपती असून महाजनांनी (Mla Girish Mahajan) दर्शन घेतल्यानंतर गणपती त्यांना सुबुद्धी मिळेल, अशी आपली भावना होती मात्र विकृत मनोवृत्तीचे लोक असल्याने दुसरीच कल्पना त्यांच्या मनात आली, असेही खडसे म्हणाले. आपली भावना प्रांजळ होती व आहे, महाजनांना दगडूशेठ हलवाई नवसाला पावेल, अशी आपली भावना असल्याचेही खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नेत्यातील कलगीतुर्यामुळे जनतेचे मनोरंजन
माजी मंत्री खडसे (Eknathrav Khadse) व माजी मंत्री महाजन (Mla Girish Mahajan) यांच्यात कोरोना झाल्यानंतर आरोपाच्या फैरी झडत असतानाच माजी मंत्री खडसेंनी महाजनांना झालेला कोरोना मोक्कान्वये कारवाई सुरू असताना तर झाला नाही ना? असा प्रश्न केल्यानंतर महाजनांनी खडसेंनी ठाण्यात उपचारार्थ पाठवण्याची गरज असल्याचे म्हटले होते मात्र या टोल्याला उत्तर देताना खडसे यांनी मला ठाण्याची गरज नसून गिरीश महाजनांना (Mla Girish Mahajan) बुधवारपेठेत पाठवण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. दोन्ही नेते एकमेकांवर निशाणा साधत असलेतरी त्यातून मनोरंजनाशिवाय काही काहीही पडत नाही मात्र दुसरीकडे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसत आहे हे देखील तितकेच खरे. कोरोना झाल्यानंतर ‘नाथाभाऊंना ठाण्याला पाठवावे लागेल’ असे वक्तव्य शनिवारी आमदार महाजन (Mla Girish Mahajan) यांनी केले होते व खडसेंनी या वक्तव्याचा समाचार घेताना मला ठाण्याला जाण्याची गरज नाही परंतु गिरीशभाऊंना (Mla Girish Mahajan) पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल, असे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
टिकेचा स्तर घसरला
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Mla Girish Mahajan) यांच्यातील वैर सर्वानाच ठाऊक आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोन्ही नेते सोडत नाही. काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसे यांना दुसर्यांदा कोरोना (Corona) झाला असता आमदार गिरीश महाजन यांनी, ‘ईडीच्या (ED) तारखा पाहून खडसेंना कोरोना होतो’ अशी टीका केली होती. शनिवारी आमदार गिरीश महाजन (Mla Girish Mahajan) यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर एकनाथराव खडसेंनी त्यावर प्रतिक्रिया देताना, मला तर खरोखर कोरोना (Corona) झाला होता परंतु सध्या मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजते त्यामुळेच गिरीश महाजन (Mla Girish Mahajan) यांना कोरोना (Corona) झाला असावा ? असा मला संशय असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले होते.
नाथाभाऊंवर ठाण्यात उपचाराची गरज
खडसेंच्या (Eknathrav Khadse) वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आमदार गिरीश महाजन यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘नाथाभाऊंना ठाण्याच्या उपचाराची गरज आहे. राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिद्ध करावे, असे खुले आव्हान आमदार महाजन यांनी दिले होते. महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत खडसेंनी जहरी टीका केली असून ‘नाथाभाऊला ठाण्याला पाठविण्याची गरज नसून गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल’ असे ते म्हणाले. तसेच जळगावात मोक्का कारवाईच्या संदर्भात पोलिसांचे पथक आले असून काल मी याबाबत बोललो होतो हा निव्वळ योगायोग आहे असेही खडसे म्हणाले.