रावेर तालुक्यातील उपद्रवींवर लवकरच होणार हद्दपारीची कारवाई


रावेर : विधानसभा निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिस व प्रशासनाने कंबर कसली आहे. सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या सात उपद्रवींचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पाठवण्यात आल्यानंतर संबंधिताना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यात कुंदन मुरलीधर तायडे (अहिरवाडी), संदीपबिल्ला गोपाळ गोमटे (अहिरवाडी), प्रदीप मोहन तायडे (अहिरवाडी), गंभीर प्रकाश कोचुरे (अहिरवाडी), विनायक धनसिंग पाटील (निरूळ), चंदू दोधु सुरवाडे (निरूळ) तसेचहर्षल अरुण बेलसकर (रावेर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी केली धडक कारवाई
रावेर तालुक्यातील 82 उपद्रवींवर 107 प्रमाणे तसेच 15 जणांवर 110 तसेच महाराष्ट्र प्रोबीशन कायद्याप्रमाणे आठ तसेच 149 प्रमाणे 75 जणांना नोटीसा बजावण्यात आल्याचे उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !