उमेदवारांचा प्रचारावर तर प्रशासनाचा मतदान जनजागृतीवर जोर


मतदानाची टक्केवारी वाढीसाठी पथनाट्याद्वारे शहर व ग्रामीण भागात केली जातेय जनजागृती

भुसावळ : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराने शेवटच्या टप्प्यात चांगलाच जोर धरला आहे. प्रचारासाठी उमेदवारांची चांगलीच पायपीट होत आहे.असे असून मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याने निवडणपक विभागाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली जात आहे. यावर मात करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान जनजागृती अभियान हाती घेतले आहे. अभियानाद्वारे मतदार व नवमतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती
निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचारावर जोर देवून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जाते तसेच निवडणूक आयोगाच्या विभागाकडून मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती अभियान राबवले जाते तसेच काही मतदारांना उमेदवारांना मतदान करायचे नसल्यास त्यांच्यासाठी मतदान यंत्रात नोटाचाही पर्याय ठेवला आहे मात्र असे असून बहुतांश मतदार मतदान करण्याचे टाळत असल्याने गत काही वर्षापासून मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. याची निवडणूक गंभीर दखल घेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढीसाठी निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार वरीष्ठ अधिकार्‍यांच्या सुचनेप्रमाणे शिक्षण विभागाच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान राबवले जात आहे. यामध्ये ‘संकल्प माझा मतदानाचा- मी मतदान करणारच’ या घोषवाक्याचा आधार घेवून भुसावळ मतदारसंघात पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी तुुषार प्रधान, रागिणी चव्हाण मतदान जनजागृती अभियानाला व्यापक स्वरूप देत आहेत. यामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये जावून नवमतदारांना मतदानाविषयी मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे तसेच शहर आणि ग्रामीण भागात पथनाट्याद्वारे मतदारांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर जोर दिला आहे. गुरूवारी भुसावळातील बस आगारामध्ये अभियानातंर्गत मतदानाची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

उमेदवारांचा प्रचारावर तर प्रशासनाचा मतदान जागृतीवर जोर
विधानसभा निवडणुकीतील मतदानाला केवळ चार दिवसांचा अवधी राहिला असल्याने उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यातील प्रचारावरील जोर वाढवला आहे. यामध्ये प्रचार रॅली, बड्या व होम टु होम प्रचारावर भर दिला जात आहे. शनिवारी उमेदवारांच्या धगधगत्या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून गुप्तप्रकारे प्रचाराचे नियोजनावर जोर दिला जात आहे. दुसरीकडे मतदानाची टक्केवारी वाढीसाठी प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृतीवर जोर दिला जात असल्याचे चित्र आहे.

वोटर स्पिपचे केले जातेय घरपोच वितरण
मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान यादीत आपले नाव शोधतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता यामुळे मतदार मतदानासाठी निरूत्साही होवून माघारी येत असे. याची दखल घेवून निवडणूक आयोगाने मतदारांना कुठल्याही अडचणीचा सामना न करता आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक शाखेने पथकाकडून मतदारांना घरपोच वोटर स्लिपचे वितरण करीत असल्याने मतदारांची चांगली सोय होत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !