शिरागडजवळील तापी काठावर अनोळखीचा मृतदेह आढळला

यावल- तालुक्यातील शिरागड गावा जवळील तापी नदीच्या काठी एका 40 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरूवारी सकाळी हा मृतदेह ग्रामस्थांच्या निर्दशनास पडला. यावल पोलिसात पोलिस पाटील सुधाकर नारायण सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. यावल पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्याचे अवाहन केले आहे. पुढील तपास हवालदार युनूस तडवी करीत आहेत.
