तरुण विवाहितेवर तिघा नराधमांनी केला बलात्कार
नवी दिल्ली : देशात महिलांवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे एका विवाहितेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसर्याचा शोध सुरू आहे.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच डीआयजी, एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह आणि इतर अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पीडितेची चौकशी केली. यासोबतच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले. ही महिला आपल्या नातेवाईकासोबत घरी परतत होती, असे सांगण्यात येत आहे. सोनभद्रच्या घोरावल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलात तीन तरुणांनी ही घृणास्पद घटना घडवली.




तिघांनीही केला बलात्कार
पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, तरुणांनी आधी तिच्या नातेवाईकाला मारहाण केली आणि हात पाय बांधले. त्यानंतर तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. तिसर्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत. या प्रकरणी एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह सांगतात की, घोरवल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलातून एक विवाहित महिला आपल्या नातेवाईकासोबत मोटरसायकलवरून घरी जात होती. तेव्हा एका निर्जनस्थळी त्यांना पाहून तिघांनी अडवले. तिघांनीही महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकाने विरोध केला. त्यानंतर तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण करून हात पाय बांधले. त्यानंतर जंगलात नेऊन महिलेवर सामूहिक बलात्कार केला.