अमळनेरच्या साने गुरुजी विद्यालयाचा जागर मतदानाचा आकाशवाणीवर

अमळनेर : अमळनेर प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांच्या प्रेरणेने स्वीप प्रोग्राम अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जनजागृतीपर पथनाट्य अ.शि.प्र.मंडळ संचलित साने गुरुजी नुतन माध्यमिक विद्यालयात सादर करण्यात आले. सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, शिक्षक अरुण पाटील, शारदा उंबरकर, डी.ए.धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादर करण्यात आले. अमळनेर शहरातील बसस्थानक परीसर, बाजार पेठ, गांधलीपुरा, पैलाड या भागात मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. दरम्यान, शनिवार, 19 रोजी मतदान जनजागृतीपर प्रभातफेरी शहरातील विविध मार्गावरून काढण्यात आली.
21 रोजी पथनाट्याचे आकाशवाणीवर प्रक्षेपण
17 ऑक्टोबर रोजी जळगाव आकाशवाणी केंद्रावर मतदान जागृतीपर पथनाट्य ध्वनी प्रक्षेपण झाल्यानंतर उद्या, रविवार, 20 रोजी सायंकाळी 5.30 वाजता व पुन्हा प्रसारण सोमवार, 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30वाजता ध्वनीप्रक्षेपीत होणार आहे. या पथनाट्यातील सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक गुलाबराव वामनराव पाटील, अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी कौतुक केले आहे.
