आमदार हरीभाऊंमुळे प्रकल्प पूर्णत्वाकडे : कृषीभूषण नारायण बापू चौधरी


यावल : शेळगाव प्रकल्पासाठी आमदार हरीभाऊ जावळे यांनी 700 कोटी रुपये मिळवले. त्यामुळे शेतकर्‍यांचे भले होणार आहे यामुळे काँग्रेसच्या शिरीष चौधरींचा जळफळाट झाला आहे. हा जळफळाट राजकीय भांडवल हातचे निघून जाण्यामुळे होत असल्याचे स्पष्ट मत कृषीभूषण नारायण बापू चौधरी यांनी भालोद येथे शनिवारी सकाळी प्रचार रॅली दरम्यान व्यक्त केले.

माजी मंत्री खडसेंनी खेचून आणला निधी
महाराष्ट्रातील तत्कालीन युती सरकारमध्ये नाथाभाऊंनी शेळगाव बॅरेजला मंजुरी दिली होती. त्यानंतरच्या आघाडीने या प्रकल्पाकडे ढुंकूनही पाहिले नाही. खुद्द शिरीष चौधरी हे तत्कालिन सत्ताधारी आमदार असताना त्यांनी प्रकल्पासाठी काय केले? सर्वांना माहिती आहे. आता आमदार हरीभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून शेळगाव बॅरेजसाठी 700 कोटींचा निधी खेचून अणण्यातत आला. डिसेंबर-जानेवारीत काम पूर्ण होईल. शेतकर्‍यांचे हरीतक्रांती स्वप्न पूर्ण होईल. शेतकर्‍यांची गरज पूर्ण होत असल्याबद्दल कौतुक करण्याचा मोठेपणा दाखवण्याचे सोडून काँग्रेसचे शिरीष चौधरी उलट प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हा जळफळाट राजकीय भांडवल हातचे निघून जाण्यामुळे आहे की? शेतकर्‍यांचे भले होईल म्हणून आहे? हे न समजण्याएवढे शेतकरी दुधखुळे नाहीत, असेही ते म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !