बोदवडच्या विवाहितेचा मृत्यू : पतीसह सासू-सासर्‍यांना अटक झाल्यानंतर अंत्यसंस्कार


लग्नात मान-पान न दिल्याने व मुलगी झाल्याने सासरच्यांकडून छळ झाल्याची तक्रार

बोदवड : शहरातील विवाहिता संगीता अश्‍विन बोदडे (20) हिने 18 रोजी दुपारी तीन महिन्यांच्या लहान मुलीला झोळीत झोपवत आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र मयत विवाहितेचा भाऊ नंदू ओंकार अंभोरे यांनी सासरच्यांनी छळ चालवल्यानेच बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप करीत आरोपींना अटक होईस्तोवर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी सासरच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत पतीसह सासु व सासरा यांना अटक केल्यानंतर शनिवारी शोकाकुल वातावरणात मृत विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हुंड्यासह मुलगी झाल्याने झळ
आरोपी सासरे संजय श्रावण बोदडे, पती अश्‍विन संजय बोदडे, सासु शैलाबाई संजय बोदडे, चुलत सासु राणीबाई मोहन बोदडे (बोदवड) व नणंद शीतल व दुसरी नणंद रक्षाबाई (जुनोना) यांच्या त्रासाला कंटाळून बहिणीने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. 5 जुन 2018 रोजी बहिणीचे इंदौर येथे लग्न झाल्यानंतर सासरी नंदाचे येणे-जाणे असल्याने त्या लग्नात मान-पान मिळाला नाही शिवाय सोन्याचे दागिने न दिल्याने बहिणीचा छळ करीत होतो शिवाय या प्रकाराला कंटाळून बहिण संगीता इंदौरला निघून आली होती. त्यानंतर ती प्रसुत झाली व तिला मुलगी झाल्यानंतर दिड महिन्यांनी ती पुन्हा सासरी आल्यानंतर तिचा छळ करण्यात आला तसेच बॅण्डची गाडी बनवण्यासाठी पैसे न आणल्याने त्यासाठीही छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरोपींच्या अटकेशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा
शनिवारी पहाटे मृताचे नातेवाईक आल्यानंतर त्यांनी बोदवड ग्रामीण रुग्णालयात मृत संगीताचा मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या उजव्या व डाव्या हाताच्या मनगटावर मारहाणीच्या खुना आढळल्या तसेच केसही अस्ताव्यस असल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेण्यात आली. पोलिसांनी पतीसह सासु व सासरा यांना अटक केल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !