ज्येष्ठांनी अंतर्मनाशी सुसंवाद साधावा

भुसावळात ज्येष्ठांशी संवाद साधताना जळगावचे निवृत्त प्राचार्य डॉ.किसन पाटील यांचे मत
भुसावळ : जन्म-मृत्यूतील अंतर म्हणजे जीवन होय. ज्येष्ठांनी अंतर्मनाशी सुसंवाद साधावा. जीवनाची वेल हिरवीगार रहावी यासाठी कुठला ना कुठला तरी छंद जोपासावा, वर्तमानाशी जुळवून घेतले तर भविष्यातील काळोख दूर होण्यास मदत होईल, असा सल्ला जळगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.किसन पाटील यांनी येथे दिला.
भुसावळात जय गणेश फाउंडेशन संचलित जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाच्या नूतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते ‘अनुभूती’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मावळते अध्यक्ष दिनकर जावळे, सचिव सुनंदा औंधकर, कोषाध्यक्ष सुरेश पाटील यांची उपस्थिती होती. समन्वयक अरुण मांडळकर यांनी सुत्रसंचालन केले. उपाध्यक्षा निशा क्षिरसागर व संघाकडून सर्व सभासदांना भोजन देण्यात आले. संघ गौरव पुरस्कार शकुंतला दामोदर बालाजीवाले, संघभूषण पुरस्कार भास्कर पुंडलिक पाटील, भानुदास ओंकार बर्हाटे, शोभा दिनकर जावळे, लक्ष्मीबाई सुरळकर यांना देण्यात आला. ज्येष्ठ सभासद म्हणून मुकूंदराव बालाजीवाले व शकुंतला बालाजीवाले यांना गौरविण्यात आले. अरुण मांडळकर व सुनंदा औंधकर यांनी त्यांच्यातर्फे संघाचे आधारवड असलेले शरद अंभईकर यांचा ट्रॉफी देऊन सन्मान केला.
नूतन कार्यकारिणीत यांचा समावेश
अध्यक्ष विलास चुडामण चौधरी, सचिव अशोक नामदेव चौधरी, उपाध्यक्ष सुनंदा औंधकर, वसंत चौधरी, सहसचिव एल. पी. चौधरी, कोेषाध्यक्ष शांताराम बोबडे, ऑडिटर सुरेश पाटील, पदसिद्ध सभासद दिनकर जावळे, विलास बेंद्रे, समन्वयक अरुण मांडळकर, सदस्य अनिल बर्हाटे, डी. जी. पानकर, भास्कर पाटील, प्रमोद काकडे, सुलोचना वारके, लक्ष्मीबाई सुरडकर, शैलजा देशपांडे, शकुंतला बढे, मार्गदर्शक डी. एस. पाटील, मुरलीधर पाटील, मंगला वाणी यांचा समावेश आहे.
शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देणार
समाजातील उपेक्षित घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबवू. दीपोत्सवात वाड्या-वस्त्यांवर जावून तेथील चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करू. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांवर अधिक भर राहील, अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष विलास चौधरी, सचिव अशोक चौधरी यांच्यासह पदाधिकार्यांनी पदग्रहण सोहळ्यात दिली. संघासाठी समन्वयक मांडळकर यांचे योगदान मोठे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
