एका कोटींच्या सोन्याची तस्करी : एअर होस्टेसला अटक


मुंबई : सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दुबईहून मुंबईला एअर होस्टेस खाजगी विमानाने आल्यानंतर त्यावेळी ही कारवाई करण्यात आली. एअर होस्टेसच्या बॅगेतून जवळपास चार किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे समजते. एअर होस्टेसने सोने बॅगमध्ये अंतर्वस्त्रात लपवून आणले होते. दुबईहून एक खासगी विमान शनिवारी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. या विमानातून एअर होस्टेस अवैधरित्या सोने आणलेली बॅग लपविण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी संशय आल्यामुळे अधिकार्‍यांनी तिला ताब्यात घेऊ चौकशी केली असता बॅगमधील अंतर्वस्त्रामध्ये सोने आढळून आल्याचे विमानतळावरील अधिकार्‍यांनी सांगितले.

60 हजार रुपये देण्याचे आश्वासन
अधिकार्‍यांनी ज्यावेळी एअर होस्टेसची चौकशी केली. त्यावेळी एअर होस्टेच्या बॅगमध्ये सोने सापडल्यानंतर तिला अधिकार्‍यांनी अटक केली. यावेळी तिने सांगितले की, एक व्यक्तीने सोने आणण्यासाठी 60 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !