भुसावळ हत्याकांड : तिघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

भुसावळ : शहरातील खरात कुटुंबातील चौघा सदस्यांसह अन्य एकाची हत्या केल्याप्रकरणी अटकेतील तिघाही आरोपींची न्यायालयीन कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता, तिन्ही संशयीताना न्यायालयीन कोठडी सुनावणयात आली. 6 ऑक्टोबर शहरात खरात हत्याकांड घडले होते. या हत्याकांडात खरात परीवारातील नगरसेवक रवींद्र खरात, मुलगा सोनू उर्फ रोहीत रवींद्र खरात व प्रेमसागर रवींद्र खरात तसेच मोठे बंधू सुनील खरात व सुमित संजय गजरे हे मृत पावले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयितांना घटनेच्याच दिवशी रात्री अटक केली होती. सुरूवातीला सात दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली तर सात दिवसानंतर ओळख परेड घेण्यासाठी पोलिस कोठडीचे हक्क कायम राखून ठेवत न्यायालयीन कोठडी घेण्यात आली होती. कोठडीत असताना सोमवारी जिल्हा कारागृहात तिन्ही संशयितांची ओळख परेड घेण्यात आल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी राजा बॉक्सर, राजा मोघे, मयुर सुरवाडे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास डीवायएसपी गजानन राठोड करीत आहेत.
