सामान्य माणूस हाच सामर्थ्यशाली


पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकूर : नाहाटा महाविद्यालयात व्याख्यान

भुसावळ : व्यवस्थेत कुणीही मोठा नसतो त्यामुळे सर्वसामान्य माणसाने न घाबरता भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध कोणतेही दडपण न घेता तक्रार नोंदवावी, कायदा आणि सर्वसामान्य व्यक्ती हेच लोकशाहीत सर्वोच्च आहे असल्याचे मत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी येथे केले. भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात, विद्यार्थी तक्रार निवारण समिती, राष्ट्रीय छात्र सेना आणि भूगोलशास्त्र मंडळातर्फे ‘भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी आपण ?’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भ्रष्टाचाराचा संबंध हा अनिती व अविवेकशीलतेशी
गोपाळ ठाकूर म्हणाले की, भ्रष्टाचाराचा संबंध हा अनिती आणि अविवेकशीलतेशी आहे, श्रीमंती किंवा दारीद्य्राशी नाही. भ्रष्टाचार ही नैतीक दारीद्य्र दर्शवते त्यामुळे शासनाचा पगार घेऊनही सर्वसामान्य लोकांची कामे करताना जे अवैध पैसे मागतात त्यांना अद्दल घडविणे गरजेचे आहे. त्याशिवाय देश भ्रष्ट्राचारमुक्त होऊ शकत नाही. वयस्कर लोकांची याबाबत भूमिका धोका न स्वीकारण्याची आणि कटकटीपेक्षा पैसे देणे, अशी नकारात्मक स्वरूपाची आहे. युवकांनो उद्याचा भारत तुमचा आहे, त्यात तुम्हाला जगायचे आहे. त्यामुळे ही कीड नष्ट करण्यासाठी तुम्ही हिंमतीने पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.ए.डी. गोस्वामी यांच्यासह विदयार्थी तक्रार निवारण समितीचे प्रमुख प्रा.अनिल हिवाळे, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, प्रा.ई.जी.नेहेते, प्रा.स्मिता चौधरी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यात अशा कार्यक्रमाची महत्वाची भूमिका असते, असे सांगून, युवकांनी भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी आव्हान स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल हिवाळे तर सूत्रसंचालन प्रा.विलास सोळुंके यांनी तसेच आभार प्रा.अजय तायडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.व्ही.पी.लढे. प्रा.मीनाक्षी बेदरकर, विद्यार्थी उमेश गोरधे, भूषण लोकाशी, शुभम सपकाळे ,सारंग नकवाल यांनी परीश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !