सानिया कादरीची न्यायालयीन तारखेला गैरहजेरी : जामिनदाराला अटक व दंडही

रावेर न्यायालयाचा निकाल : पुढील तारखेला सानिया कादरीला हजर करण्याचे आदेश
यावल : भुसावळातील प्रसिद्ध गायीका व बांधकाम व्यावसायीक सानिया कादरी या रावेर न्यायालयाच्या तारखेवर हजर राहत नसल्याने त्यांच्या जामीनदाराला अटक करून न्यायालयाने 15 हजारांचा दंड ठोठावला. पुढील तारखेला संशयीत आरोपी सानिया कादरी यास सोबत घेवून हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जामीनदार झाल्याचा चांगलाच फटका यावल तालुक्यातील किनगावच्या महेबुब तडवी यांना बसला आहे.
संशयीत आरोपी हजर न झाल्याने जामिनदाराला दंड
भुसावळच्या बांधकाम व्यावसायीक सानिया कादरी यांना एका गुन्ह्यात किनगाव खुर्द, ता.यावल येथील महेबुब गंभीर तडवी हे जामीनदार झाले असून रावेर न्यायालयात त्यांनी जामीन देवून सानिया कादरी यांची सुटका केली होती या गुन्ह्याच्या तारखेवर सानिया कादरी येत नसल्याने न्यायालयाने आधी त्यांचा अटक वारंट काढला मात्र त्या पोलिसांना मिळून न आल्याने त्यांना जामीन झालेले किनगाव खुर्द येथील महेबूब तडवी यांच्याविरुद्ध वारंट काढण्यात आले. यावल पोलिसांनी त्यांना 15 ऑक्टोबर रोजी अटक करून रावेर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 15 हजाराचा दंड ठोठावला व पुढील तारखेवर सानिया कादरीसह हजर राहण्याचेे आदेश दिले.. पुढील तारखेवर सानिया कादरी हजर झाली नाही तर तडवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने जामीनदाराला अटक करून दंड केल्याने तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
