सेल्फी घेताना भुसावळातील तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
धुळे : सेल्फी घेताना शेततळ्यात बुडाल्याने भुसावळ शहरातील किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. सलमान शाह (15, चिमटा मोहल्हा, भुसावळ) असे मृत मुलाचे नाव आहे. सेल्फी घेताना सलमान तळ्यात पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मोहाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
भुसावळ येथील चिमटा मोहल्ला येथील रहिवासी सलमान शाह सलीम शाह (वय 15) हा धुळ्यात राहणार्या नातलगांकडे आला असता अन्वर नाला परीसरात सागाच्या मळ्याजवळ तो फिरण्यासाठी गेला असता शेततळ्यातील मासे तो पाहत होता. तळ्याजवळ उभा राहून तो सेल्फी घेत असताना पाय घसरून त्याचा तोल गेल्याने सलमान तलावात बुडाला. शोध घेऊनही तो मिळून आला नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह मिळून आला.




