भुसावळात जयंती उत्सव समिती निवडीवरून गोळीबार : गुन्ह्यातील पसार संशयीत अखेर जाळ्यात
Bhusawal Firing भुसावळ : शहरात जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदावरून झालेल्या वादानंतर दोन गटात हाणामारी झाली होती तर दगडफेकीत कार, मोटर सायकलीचे मोठे नुकसान होवून हवेतही कट्ट्यातून फैरी झाडण्यात आल्या होत्या. ही घटना 25 फेब्रुवारी 2019 रोजी समता नगरात घडली होती. या घटनेतील पसार आरोपी योगेश हिरालाल मोघे (27, रा.भुसावळ) (yogesh hiralal moghe)यास शुक्रवार, 5 रोजी भुसावळ परीसरातून अटक करण्यात आली. संशयीतास भुसावळ न्यायालयाने (bhusawal court) चार दिवसांची पोलिस कोठडी (4 days pcr) सुनावली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सन 2019 मध्ये भुसावळातील समता नगरात (bhusawal samta nagar firing) झालेल्या वादानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल होता व त्यात संशयीत योगेश हिरालाल मोघे हा वॉण्टेड असल्याने त्याचा शोध सुरू असतानाच त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे (dysp somnath waghchure), प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड (pi rahul gayakwad) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, बाजारपेठ प्रशांत सोनार, जाकीर मन्सुरी, इकबाल सैय्यद यांनी ही कारवाई केली.




