Bhusawal Rape भुसावळात तरुणीवर बलात्कार : आरोपी जवानाला अटक
Bhusawal Rape भुसावळ : लग्नाचे आमिष दाखवून सैन्य दलातील जवानाने धरणगाव तालुक्यातील एका गावातील तरुणीवर भुसावळात अत्याचार (bhusawal rape) केल्याची घटना फेब्रुवारी 2022 महिन्यात घडली होती. या प्रकरणी आकाश संजय काळे (रा.धरणगाव तालुका) याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा (bhi sawal bajarpet police station) दाखल करण्यात आला होता. शनिवारी रात्री संशयीत आरोपीस अटक करण्यात आली तर रविवारी संशयीतास भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी (till 9 march pcr) सुनावण्यात आली.
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार
पीडीत व संशयीत आरोपी हे धरणगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहेत. 24 वर्षीय तरुणीशी संशयीत आरोपी जवान आकाश संजय काळे (aakash sanjay kale) याचे चार वर्ष प्रेमसंबंध राहिले व लग्न करण्याचे आमिष दाखवून जवानाने तरुणीला भुसावळात आणल्याने शहरात गॅलेक्सी हॉटेलमध्ये (hotel gslaexi) अत्याचार (rape) केल्याची घटना 26 फेब्रुवारी 2022 रोजी घडली होती. यानंतर तरुणीशी विवाह करण्यास जवानाने नकार दिल्याने फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने तक्रार दिल्यानंतर धरणगाव पोलिसात (dharangaon police station) शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्ह्याचे कार्यक्षेत्र भुसावळ असल्याने जवानाला ताब्यात घेवून हा गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलिसात वर्ग करून संशयीतालाही ताब्यात देण्यात आले होते. आरोपीला जवानाला भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात रविवारी हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला (api mangesh gontla) करीत आहेत.





