देव दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात : चाळीसगाव तालुक्यातील चौघे ठार


Chalisgaon Bhavik Accident नाशिक : चंदनपुरीच्या खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेल्या चाळीसगाव तालुक्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन या अपघातात चार भाविक (four death) जागीच ठार झाले तर सुमारे 15 भाविक जखमी झाल्याची घटना चाळीसगाव रोडवरील गिगाव फाट्यावर हा घडली. जखमींवर मालेगाव जवळील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. लिलाबाई पोपट पाटील (65), कांतीलाल पोपट पाटील (48), बन्सीलाल राघो पाटील (43) व आबाजी जालम पाटील (60, चौघे रा.मुंदखेडे) अशी ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत.

टेम्पो उलटल्याने अपघात
भाविकांना घेऊन जाणार्‍या टेम्पो उलटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात चौघांचा मृत्यू (for death) झाला असून 15 पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्त हे चाळीसगाव तालुक्यातील असून चंदनपुरी (chandanpuri) येथे नवसपूर्ती कार्यक्रमासाठी गेल्याचे सांगण्यात आले. नवसपूर्तीनंतर परतत असताना 407 (एम.एच.19 बी.एम.0102) वाहन उलटल्याने अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनातून 30 भाविक प्रवास करत असल्याची माहिती आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त लोक हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा (mundkheda) या गावचे असल्याची माहिती मिळाली आहे.






पोलिसांची घटनास्थळी धाव
तालुका पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, एपीआय हेमंत पाटील, उपनिरीक्षक विशाल पाटील, नगरसेवक मदन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना तातडीने मालेगावी उपचारार्थ रूग्णवाहिकेतून हलविले. जखमींवर सामान्य रूग्णालयासह शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार केले जात असून गंभीररीत्या जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !