भुसावळात खळबळ : अल्पवयीन मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाचा अत्याचार
Bhusawal Rape भुसावळ : दोन दिवसांपूर्वीच धरणगाव तालुक्यातील तरुणीवर शहरात अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा 12 वर्षीय मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी जयंत रायन (75) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
ट्यूशनला गेल्यानंतर केला अत्याचार
रविवार, 6 मार्च 2022 रोजी दुपारच्या सुमारास पीडित 12 वर्षीय मुलगी दुपारी दोन वाजता ट्यूटशनला आली असता यावेळी कुणीही आले नसल्याची संधी साधून संशयीत आरोपी तथा सेवानिवृत्त शिक्षक जयंत रायन (75, रा.भुसावळ) याने पीडीत मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडीतेने घरी आल्यानंतर आईला सांगितला. त्यानंतर सोमवार, 7 रोजी पीडीतेच्या कुटुंबियांनी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेवून घडलेला प्रकार सांगितला.





आरोपी नराधमाला अटक
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग 5 सीसीटीएनएस गुरंन 141/2022 भादंवि 376 (अ.ब) 376, (3) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6 प्रमाणे जयंत रायन या नराधम सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. अधिक तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला हे करीत आहेत.
