गोजोरे विकासोत शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय
भुसावळ : तालुक्यातील गोजोरे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला. कमलाकर कोल्हे यांच्या शेतकरी पॅनलने 13 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय मिळवला तर दोन महिला उमेदवारांना समान मते मिळाली त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. सोसायटी बचाव पॅनलला दोन जागा मिळाल्या.
या उमेदवारांनी मिळवला विजय
गोजोरे विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार असे- इतर मागास वर्ग- कमलाकर सुरेश कोल्हे (बिनविरोध), भटक्या विमुक्त जाती जमाती- धनगर मधुकर कौतीक(208), अनुसूचित जाती-जमाती- देविदास भादू तायडे (186), महिला राखीव- कुसूम पंढरीनाथ वारके (195), कल्पना पुंडलिक राणे (ईश्वर चिठ्ठीने, 178), सर्वसाधारण- परशुराम ज्ञानदेव राणे (198), शिवाजी पंडित पाटील (190), अरविंद वासुदेव वारके (178), मुरलीधर नथ्थू पाटील (175), निवृत्ती पंडित पाटील (172), अशोक सोमा तळेले (172), शांताराम सोमा पाटील (169), अरुण जनार्दन नेमाडे (158).





एका जागेसाठी ईश्वर चिठ्ठी
या निवडणुकीत महिला राखीव जागेसाठी कल्पना पुंडलिक राणे व लीना अनिल रणे यांना 178 अशी समान मते मिळाली त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात कल्पना पुंडलिक राणे निवडून आल्या. निवडणूक अधिकारी म्हणून ए.यु.तडवी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर धनगर तसेच मतमोजणी साठी सुनसगाव विविध कार्यकारी सोसायटी चे सचिव योगेश पाटील यांनी सहकार्य केले.
