घाटात मारहाण करून 24 वर्षीय नराधमांचा विवाहितेवर अत्याचार : या जिल्ह्यातील धक्कादायक घटना


Buldhana Rape बुलडाणा : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला 24 वर्षीय विवाहितेवर दोन नराधमांनी घाटात अत्याचार (rape) केल्याची घटना घडली.  24 वर्षीय विवाहितेने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राज्याचे अपर पोलीस महासंचालक मधुकर पाण्डेय वार्षिक निरीक्षणासाठी सकाळीच शहरात दाखल झाले असतानाच घडलेल्या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

घाटात अडवून मारहाण करीत अत्याचार
बुलडाणा शहरातील एका भागातील दाम्पत्य रविवार, 6 मार्च रोजी धाड येथे भाड्याने राहण्यासाठी रूम शोधण्यासाठी गेले होते. धाड येथे सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचल्यानंतर काम आटोपून रात्री दहा ते साडेदहा वाजेदरम्यान धाडहून बुलडाण्याकडे ते येत असताना रात्री 11.30 वाजेदरम्यान चिखला घाटाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. त्यातील एकाने हातात दगड घेऊन पीडितेच्या पतीस बेदम मारहाण केली, तर दुसर्‍याने पीडितेला रस्त्याकडेला नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार (Rape) केला. त्यानंतर दुसर्‍यानेही विवाहितेवर जबरदस्ती अत्याचार केला.






ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेत हे पती-पत्नी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय प्रशासनाने ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडिता व तिच्या पतीचा जबाब घेतला. याप्रकरणी विवाहितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध विविध कलमांन्वये 7 मार्च रोजी सकाळी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख (pi ravindra deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !