मुक्ताईनगर निरीक्षकांची अन्य जिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून चौकशी : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात वाढलेल्या अवैध धंद्यांसह गुन्हेगारीबाबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई विधानसभेत म्हणाले की, मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची दुसर्‍या जिल्ह्यातील वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून 15 दिवसांच्या आत चौकशी होईल शिवाय ते दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

दारूबंदीसह दरोड्यातील गुन्ह्यात कारवाई
मुक्ताईनगरमध्ये दारुबंदी आणि जुगाराच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. 2020 मध्ये दारुबंदीचे 84 तर 2021 मध्ये 105 गुन्हे दाखल असून 2020 मध्ये जुगाराचे 25 तर 2021 मध्ये 36 गुन्हे दाखल केले आहेत. हलखेडा येथील दरोड्याच्या गुन्ह्यात 9 पैकी 6 आरोपी अटकेत असून इतरांचा शोध सुरू असल्याचे गृहराज्यमंत्री म्हणाले. 2021 मध्ये मुक्ताईनगर हद्दीत तडीपारीचा एक प्रस्ताव होता, असे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.



शेजारील जिल्ह्यातील अधिकारी करणार चौकशी
मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांची उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळले नाही मात्र आता या पोलिस निरीक्षकांची शेजारील जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !