राजधानी एक्स्प्रेसला भुसावळात थांबा देण्यासह लखनऊ, कानपूरसाठी किसान रेल हवी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार रक्षा खडसे यांची लोकसभेत रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
मुक्ताईनगर : राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थासनकावर थांबा द्यावा तसेच लखनऊ व कानपूरसाठी सावदा रेल्वे स्थानकावरून किसान रेल सुरूकरावी, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान लोकसभेमध्ये खासदार रक्षा खडसे यांनी केली.
भुसावळातील मद्यपी चालकांसह रॅश ड्रायव्हींग करणारे चालक आज पोलिसांच्या ‘रडारवर’
लखनऊ, कानपूरसाठी किसान रेल हवी
रावेर लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केळी तसेच कापूस, सोयाबीन व मका आदी पिके घेतली जातात. हा सर्व शेतमाल व धान्यासाठी आता वेगवेगळ्या अश्या मेट्रोज व मोठ्या शहरांना जोडणारे 72 रूटवर किसान रेल्वे कार्यान्वित आहेत. भुसावळ रेल्वे विभागातील सावदा व रावेर ह्या दोन स्टेशनहून किसान रेल उपलब्ध आहे मात्र निंभोरा येथून दिल्ली येथील आदर्शनगरसाठी तर सावदा, निंभोरा व रावेर स्टेशनवरून लखनौ व कानपूरकरीता केळी मालवाहतूक करण्यासाठी किसान रेल्वे सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी खासदारांनी केली. केळी वाहतुकीसाठी शेतकर्यांना ट्रान्सपोर्ट वाहतुकीस अधिक खर्च लागतो मात्र किसान रेल्वे सुरू झाल्यास शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


भुसावळातील मॉल फोडणार्या मथुरेतील चोरट्यांची पोलिस कोठडीत रवानगी
राजधानीला भुसावळात द्यावा थांबा
मुंबईहून दिल्लीसाठी राजधानी एक्सप्रेस 22221/22222 सुरू करण्यात आली आहे मात्र गाडीसाठी जळगावहून जॉईन होणारा स्टाफ व मुंबईहून येणारा स्टाफ या सर्वांना भुसावळहून जळगाव हा प्रवास करावा लागतो. त्यात वेळेसह खर्चही होतो त्याऐवजी व्यापारी व प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राजधानी एक्सप्रेसला भुसावळात थांबा द्यावा तसेच भुसावळहून मुंबई कडे जाण्यासाठी एक स्पेशल ट्रेन सुरू करावी तसेच जळगावसह बुलढाणा जिल्ह्यातील पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व नोकरी करीत असलेल्या नागरीकांसाठी भुसावळ ते पुणे नवीन ट्रेन सुरू करण्याची मागणी खासदारांनी केली
मुक्ताईनगरात भरदिवसा चोरट्यांचा 60 हजारांच्या ऐवजावर डल्ला


